बार्दो — झी नाट्य गौरव २०२० सर्वाधिक ५ पुरस्कार प्राप्त नाटक — याचा नाशिक येथे पहिला प्रयोग

बार्दो — झी नाट्य गौरव २०२० सर्वाधिक ५ पुरस्कार प्राप्त नाटक याचा नाशिक येथे पहिला प्रयोग

शंतनू चंदात्रे लिखित आणि अनुप माने दिग्दर्शित बार्दो या नाटकाला झी नाट्य गौरव २०२० मध्ये सर्वाधिक ५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

सर्वोत्कृष्ट लेखन – शंतनू चंदात्रे

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – अनुप माने

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – यश नवले

सर्वोत्कृष्ट नेपथ्य – अमेय भालेराव

आणि सर्वोत्कृष्ट लक्षवेधी नाटक

‘बार्दो’ नाटकाचे वर्णन करताना दिग्दर्शक अनुप माने यांनी सांगितले की, “तिबेटी बौध्द धर्मात बार्दो ही संकल्पना मृत्यूनंतर आणि पुनर्जन्माच्या आधीची अवस्था आहे. हे नाटक मृत्यूच्या पलीकडे असलेल्या एका वेगळ्या मितीत प्रेम, असक्ती, वैमनस्य आणि जीवन दाखवण्याचा प्रयत्न करतं.”