संतोष पवार लिखित-दिग्दर्शित ‘हौस माझी पुरवा’ या धमाल कॉमेडी नाटकाचा मी लिहिलेला रीव्ह्यू

हौस माझी पुरवा [Review] — सहकुटुंब अनुभवावा असा हास्यरसाचा बूस्टर डोस

संतोष पवार यांनी या नाटकासाठी लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार व अभिनेता अशा चारही भूमिकेत उत्तम कामगिरी बजावली आहे. सोप्या पद्धतीचे पण अचूक नेपथ्य आणि तितकंच सडेतोड लिखाण करत त्यांनी क्षणोक्षणी प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे. नाटकाचा उत्तरार्ध हा पूर्वार्धापेक्षा थोडासा उजवा ठरला आहे. शेवटापर्यंत नाटकाचा आलेख कमालीच्या उंचावर जाऊन पोहोचतो. राजकीय, शासकीय व सामाजिक विषयांवर भाष्य करणारं हे नाटक प्रेक्षकांना कधी स्वत:कडे खेचून घेतं हे प्रेक्षकांना कळतदेखील नाही.

नाटकाची संपूर्ण टीम एक सुंदर कलाकृती बघण्याची तुमची हौस पूरी करण्यात नक्कीच यशस्वी ठरली आहे. हे नाटक बघितलंत तर तुम्ही एक सुंदर अनुभव घेऊन समाधानाने नाट्यगृहातून बाहेर पडाल. या धाटणीच्या लिखाणाची आज खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे. जास्तीत जास्त संख्येने प्रेक्षक या नाटकाला हजेरी लावतील याबद्दल काही शंकाच नाही.